पनवेल / प्रतिनिधी : ईद उल फित्र अर्थात रमजान ईद. मुस्लिम बांधवांचा वर्षातील सर्वांत मोठा सण मुस्लिम धर्मींयांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी हा सण कोरोना विषाणू आजार व लॉकडाऊन यामुळे यावर्षी ईद साजरा करण्यासाठी सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबांना कठीण जाणार आहे. याची जाणीव ठेवूनच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आदेशानुसार व राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामा, खजिनदार नारायण कोळी यांच्या मार्गदर्शनानुसार व राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक यांच्या संकल्पनेनुसार आज पनवेल येथील कच्ची मोहल्ला याठिकाणी वास्तव्य करणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना येणाऱ्या ईद निमित्त घरामध्ये गोड - धोड करून खाण्यासाठी शीरकुर्माचे साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्यांमध्ये काजू - बदाम, शेव पॅकेट, खोबरे, मावा व साखर या वस्तू असून गोर - गरीब मुस्लिम बांधवांची ईद यावेळी देखील उत्साहात साजरी व्हावी तसेच दरवर्षीप्रमाणे ईद साजरी करून घरामध्ये शिरखुर्मा बनवून आपल्या परिवारातील सदस्यांना देऊन एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात हा हेतू आमचा असून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आमच्या डोळयासमोर नेहमीच आहे व त्यानुसारच आम्ही कामे करीत आहोत असे केवल महाडिक यांनी सांगितले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडून आलेल्या या मदतीमुळे मुस्लिम बांधवानी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांचे आभार मानले. यावेळी राजे प्रतिष्ठानचे खांदा कॉलनी अध्यक्ष किरण पालये, अनिकेत घाडगे, इस्माईल तांबोळी, शफिक शेख, अरबाज कच्ची, सलमान कच्ची यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे रमजान ईदनिमित्त पनवेलमधील गरजू मुस्लिम कुटुंबांना शीरखुर्मा साहित्याचे वाटप.