जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचा राष्ट्रवादी मध्ये येण्याचा ओघ सुरूच

जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांचा राष्ट्रवादी मध्ये येण्याचा ओघ सुरूच
पनवेल /प्रतिनिधी.
 श्री संदीप म्हात्रे, सुनील ढेंबरे, व मंगेश नेरुळकर प्रभाकर फडके अनुराग गायकवाड विकास पाटील यांच्या उपस्थितीत केले युवकांनी प्रवेश


  गेल्या काही दिवसापासून पनवेल शहर जिल्हा कार्यकारणी मध्ये सतीश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन शिबीर व प्रवेशाचा झंजावात थांबण्याचे नाव घेत नाही.


 आज कळंबोली या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश सचिव राष्ट्रवादी युवक कांग्रेस श्री संदीप म्हात्रे, पनवेल विधानसभा युवक अध्यक्ष सुनील ढेंबरे  व पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर, पनवेल विधानसभा सचिव प्रभाकर फडके, अनुराग गायकवाड ,विकास पाटील, अनिल डोंगरे ,बजरंग म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये युवा कार्यकर्ता महेश पाटील व त्यांच्या 30 युवा सहकाऱ्यांनी युवा नेते पार्थ दादा पवार त्यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत व पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री सतीश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये प्रवेश केला. यावेळी श्री सतीश पाटील साहेबांनी युवकांना काेरोना संदर्भात घ्यायची खबरदारी व जनतेला आपत्कालीन परिस्थिती कसे सहकार्य करावे या संदर्भात मार्गदर्शन युवकांना केले.