महाराष्ट्र नवनिर्माणसेना तर्फे गुरुद्वाराचे माझी अध्यक्ष व संस्थापक सदस्य श्री. हरचंद सिंह सग्गु यांना सन्मानित
पनवेल दि.16 (वार्ताहर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री अविनाश पडवळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप जिल्हा अध्यक्ष श्री. अतुल चव्हाण यांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथील गुरुद्वाराचे माझी अध्यक्ष व संस्थापक सदस्य श्री. हरचंद सिंह सग्गु यांनी गुरुद्वाराच्या माध्यमातून गेली चार महिने गोरगरिबांना धान्य व जेवणाचे अविरत सेवा देण्याचे काम केले त्याबद्दल त्यांचा मनसेचे नवीन पनवेल शहर अध्यक्ष श्री. पराग बलड यांनी त्यांना कोरोना योद्धा म्हणून शाल व सन्माचिन्ह देऊन सन्मानित केले तसेच नवीन पनवेल येथील डॉक्टर श्री प्रसन्न चंद्रात्रे यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये येणाऱ्या पेशंटला योग्य ते सहकार्य केले याबद्दल त्यांनादेखील शाल व सन्मानचिन्ह देऊन कारोना योद्धा म्हणून सन्मानित केले तसेच नवीन पनवेल येथिल सफाई कर्मचारी याना देखील करोना योद्धा म्हणून शाल व सन्मानचिन्ह देउन सन्मानित कर्न्यात आले याप्रसंगी मनसेचे नवीन पनवेल येथील ॲड.संतोष सरगर;विभागअध्यक्ष रोशन पाटील;विभागअध्यक्ष अनिकेत मोहिते आणि मंदार गोसावी,सौरभ पाटोळे, प्रफुल कांबळे आदी मनसेनिक उपस्थित होते